सर्बियाचे प्रधानमंत्री मिलोस वुसेविक यांनी आज राजीनामा देण्याची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी म्हणजे गेल्या नोव्हेंबरमधे एक रेल्वेस्थानक कोसळल्याप्रकरणी सातत्यानं मोठ्या प्रमाणावर निदर्शनं सुरु आहेत. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला होता. काल बेलग्रेड इथं विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवर वुसेविक यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. एक वर्षापेक्षा कमी काळ ते प्रधानमंत्री पदावर राहिले आहेत.
Site Admin | January 28, 2025 8:13 PM | Belgrade | Milos Vucevic
सर्बियाचे प्रधानमंत्री मिलोस वुसेविक यांची राजीनामा देण्याची घोषणा