डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 8, 2025 8:59 PM | Stock Market

printer

जगभरातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी

जगभरातल्या बाजारातली तेजी आणि रिझर्व्ह बँकेकडून उद्या पाव टक्के व्याजदर कपातीची आशा यामुळे देशातल्या शेअर बाजारांनी काल झालेलं निम्मं नुकसान आज भरुन काढलं. तीन दिवसानंतर तेजीत बंद झालेला सेन्सेक्स आज १ हजार ८९ अंकांची वाढ नोंदवून ७४ हजार २२७ अंकांवर बंद झाला. निफ्टी पावणे ४०० अंकांच्या वाढीसह २२ हजार ५३६ अंकांवर स्थिरावला. 

वित्तीय सेवा, ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान, सरकारी कंपन्या, वाहन, बांधकाम उद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज वधारले.  युरोपियन बाजार आज ३ टक्क्यांपर्यंत, जपानी बाजार ६ टक्क्यांपर्यंत वधारले होते. अमेरिकी बाजारातही थोडीफार तेजी होती. 

सोन्याचे दर आज तोळ्यामागे ५०० रुपयांनी घसरले आणि २२ कॅरेट सोनं ९१ हजार २०० रुपये तोळ्यानं विकले जात होतं. चांदीचे दर ९० हजार ३०० रुपये किलो दरावर जवळपास समान होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.