डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची निवड

दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका, संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. काल पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला.

 

पुढच्या वर्षी 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला हे संमेलन होणार आहे. तारा भवाळकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकसाहित्याचा अभ्यास, लेखन, संशोधन आणि चिंतन यामध्ये व्यतीत केलं असून त्यांनी 36 पेक्षा जास्त पुस्तकं लिहीली आहेत. लेखनकार्यासाठी अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं आहे.