जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली

जम्मू काश्मीर मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.खोऱ्यातल्या बाटोटे – डोडा – किश्तवाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४४ आणि जम्मू ते श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर त्याचप्रमाणे डोडा, रामबान आणि उधमपूर जिल्ह्यात विविध सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत चेहऱ्याने ओळख पटवणारी प्रणाली, ड्रोन द्वारे गस्त त्याचप्रमाणे सीसीटीव्ही च्या माध्यमातून देशविघातक कारवायांवर लक्ष ठेवले जाणार आहे. दोन्ही महामार्गांवर जागोजागी तपासणी नाके उभारण्यात आले असून या ठिकाणी अचानक तपासणी केली जात आहे. सर्व शहरांच्या प्रवेशद्वारांवरही येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी केली जात आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.