रशिया आणि युक्रेनदरम्यान युध्दबंदींची सुटका करण्याचा दुसरा टप्पा काल पुर्ण झाला. यामध्ये आजारी असलेले बंदी, युध्दामुळे गंभीर जखमी झालेल्या सैन्यदलातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलांच्या, राष्ट्रीय गार्डच्या आणि सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना मुक्त करण्यात आलं असल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी दिली. तर रशियाच्या एका समूहाचे सैनिक युक्रेनच्या कैदेतून परत आले आहेत आणि ते बेलारूसमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली असल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. इस्तंबूलमध्ये झालेल्या करारांनुसार युद्ध कैद्यांची ही देवाण घेवाण सुरू आहे. दोन्ही देशांनी गंभीरपणे जखमी असलेल्या सैनिकांची आणि 25 वर्षांखालील सैनिकांची देवाण-घेवाण करण्यावर सहमति दर्शवली होती.
Site Admin | June 13, 2025 10:32 AM | युक्रेन | रशिया
रशिया आणि युक्रेनदरम्यान युध्दबंदींची सुटका करण्याचा दुसरा टप्पा पुर्ण
