डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. २३ उमेदवारांच्या यादीत काँग्रेसनं राळेगाव इथून माजी मंत्री वसंत पुरके, सावनेरमधून अनुजा केदार, अर्जुनी-मोरगाव इथून दिलीप बनसोड, जालन्यातून कैलास गोरंट्याल आणि शीव-कोळीवाडा मतदारसंघातून गणेश यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं धुळ्यातून अनिल गोटे, हिंगोलीतून रूपाली पाटील, शिवडीतून अजय चौधरी तर भायखळ्यातून मनोज जामसुतकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.