देशभरात वाढत्या आर्थिक फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी सेबीनं सुरू केलेल्या SEBI vs SCAM या देशव्यापी कार्यक्रमाला हातभार लावण्याच्या उद्देशानं नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं सर्वसमावेशक गुंतवणूकदार संरक्षण मोहीम हाती घेतली आहे.
गुंतवणूकदारांना फसवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आज गुन्हेगार करत आहेत. असे प्रकार वेळीच ओळखून त्यांची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यासाठी आणि पर्यायाने आणखी सुरक्षित आणि पारदर्शक आर्थिक यंत्रणा उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना तयार करणं हा या योजनेचा उद्देश आहे. याअंतर्गत टीव्ही, रेडिओ आणि डिजिटल माध्यमं, तसंच सोशल मीडियावरून गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचणार असल्याचं सेबीनं सांगितलं आहे.