डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अंतराळ क्षेत्रात भारतीय तरुणांसाठी मोठी संधी असल्याचा प्रधानमंत्र्यांचा विश्वास

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना मानवतेच्या भविष्याकरिता अवकाशाच्या खोल  शोधासाठी तयारी करण्याचं आवाहन केलं आहे.  काल राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त एका चलचित्र संदेशात मोदी म्हणाले की, भारत चंद्र आणि मंगळावर पोहोचला असल्याचं सांगताना मोदी यांनी भारत क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करत आहे असं म्हणाले.

 

आपल्या शास्त्रज्ञांच्या समर्पित प्रयत्नांनी भारत लवकरच गगनयान मोहीम सुरू करेल आणि येत्या काही वर्षांत स्वतःचे अंतराळ स्थानक उभं करेल. प्रधानमंत्र्यांनी ठामपणे प्रतिपादन केलं की ३५० हून अधिक स्टार्टअप्स अंतराळ तंत्रज्ञानात नवोपक्रम आणि गतीचे इंजिन म्हणून उदयास येत आहेत.

 

खाजगी क्षेत्राने बनवलेला पहिला पीएसएलव्ही रॉकेट लवकरच प्रक्षेपित केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. अंतराळ क्षेत्रात भारतीय तरुणांसाठी एक मोठी संधी निर्माण होत असल्याचं  प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. त्यांनी पीक विमा योजनांमध्ये उपग्रह-आधारित मूल्यांकन, मच्छीमारांसाठी उपग्रह-सक्षम माहिती आणि सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि  प्रधानमंत्री गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनमध्ये भू-स्थानिक डेटाचा वापर यासारख्या उदाहरणांचा उल्लेख केला.