डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विदर्भात नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राला सुरुवात

राज्य शिक्षण मंडळाच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राला विदर्भात आजपासून सुरुवात झाली. 

 

वाशिम जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. 

 

यवतमाळ जिल्ह्यातही प्रभात फेरी काढून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. सुकळी इथं फुगे आणि हारांनी सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक निघाली. विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ पाठ्यपुस्तके देऊन करण्यात आलं.

 

गोंदिया जिल्ह्यात आज शाळेच्या पहिल्या दिवशी ‘पहिलं पाऊल’ उपक्रमांतर्गत नव्या विद्यार्थ्यांचे ठसे उतरवण्यात आले. त्यांना वह्या, पुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आलं. तसेच, फुलं देऊन त्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा