डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विद्यार्थ्यांसाठी स्कूलबस परवाना वाटप खुलं केल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती

शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूकीचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी स्कूलबस परवाना वाटप खुलं केल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी होईल, असं सरनाईक म्हणाले. केंद्र सरकारनं स्कूलबस नियमावली तयार केली आहे. यानुसार १२ अधिक १ आसनव्यवस्था असलेल्या चारचाकीला स्कूलबसचा दर्जा दिला जाणार आहे. यात जीपीएस, अग्निशमन अलार्म यंत्रणा, सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन, वाहन ट्रॅकिंग, पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे, असं सरनाईक यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा