October 6, 2025 2:43 PM

printer

कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जबाब मागितला

लडाखमधले वैज्ञानिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाकडून एका आठवड्यात जबाब मागितला आहे. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांनी हा आदेश दिला. लडाखमधे हिंसक आंदोलनं झाल्यानंतर सोनम वांगचुक यांना १४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झाली आहे. पुढची सुनावणी येत्या १४ ऑक्टोबरला होईल.