कच्च्या कैदेत असलेल्या एका आरोपीला पन्नासहून अधिक वेळा न्यायालयात हजर करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्यातल्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी ८५ सुनावण्या झाल्या असून त्यापैकी ५५ सुनावण्यांमध्ये संबंधित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं नव्हतं. ही परिस्थिती भयंकर आणि धक्कादायक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या पीठाने नोंदवलं आहे. २०२१मध्ये झालेल्या या प्रकरणात हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल एका आरोपीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्ता आरोपी गैरहजर असल्याचं लक्षात आल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसंच, या संपूर्ण प्रकाराविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देऊन पुढची सुनावणी पुढच्या वर्षी ३ फेब्रुवारी रोजी निश्चित केली आहे.
Site Admin | December 3, 2025 7:38 PM | Maharashtra | Supreme Court
कच्च्या कैदेत असलेल्या आरोपीला हजर करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे