December 1, 2025 8:04 PM | CBI | Supreme Court

printer

देशभरात डिजिटल अटक फसवणूक प्रकरणांचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला

देशभरात डिजिटल अटक फसवणूक प्रकरणांचा तपास आज सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला. देशात डिजिटल अटक घोटाळे, गुंतवणूक घोटाळे आणि अंशकालीन कामासंबंधीचे घोटाळे या तीन प्रकारचे सायबर घोटाळे होत असल्याची माहिती, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठाला ॲमिकस क्युरिए अर्थात न्यायमित्रांनी दिली. अशा प्रकरणांमध्ये नागरिकांना अमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जात असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली आणि त्यातही, विशेषतः डिजिटल अटकेच्या प्रकरणांचा तपास सीबीआयनं प्राधान्यानं करावा, यावरही त्यांनी भर दिला. त्यानुसार, डिजिटल अटक प्रकरणांचा तपास आधी करायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.