डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शाळांमधे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्रसरकारनं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

शाळांमधे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्रसरकारनं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. बदलापूर प्रकरणी एका सेवाभावी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती  एन कोटीश्वर सिंग यांच्या पीठापुढं सुनावणी झाली. फक्त पाच राज्यांनी केंद्रसरकारच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकीलानं न्यायालयाला सांगितलं. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांची समन्वय राखावा, आणि या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची देखरेख करावी, अशा सूचना न्यायालयानं दिल्या.