२०३० पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न ४ हजार डॉलर्सच्या पुढे जाईल असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे. यामुळे जागतिक बँकेच्या वर्गवारीनुसार भारत चीन आणि इंडोनेशियाच्या रांगेत जाऊन बसणार आहे. भारताला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनायला साठ वर्षं लागली मात्र २०१४ नंतर केवळ सात वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था दोन ट्रिलियन आणि पुढल्या सात वर्षात तीन ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. तर २०२५ मधे अर्थव्यवस्थेने चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला. पुढल्या दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरचं लक्ष्य गाठेल असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या अहवालात म्हटलं आहे. २०१९ मधे भारताचं दरडोई उत्पन्न दोन हजार डॉलरपर्यंत पोहोचलं, २०२६ मधे ते ३ हजार डॉलरपर्यंत पोहोचेल. गेल्या दशकभरात भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
Site Admin | January 19, 2026 1:04 PM | SBI
२०३० पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न ४ हजार डॉलर्सच्या पुढे जाईल – SBI