नवीन कामगार कायद्यांमुळे ७७ लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत १ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. २१ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या कायद्यांमुळं संघटित कामगारांचं प्रमाण किमान १५ टक्क्यांनी वाढून सुमारे साडे ७५ टक्क्यांपर्यंत जाईल.
आजघडीला हे प्रमाण ६० पूर्णांक ४ दशांश टक्के असल्याचा अंदाज आहे. सध्या देशभरात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांची संख्या सुमारे ४४ कोटी इतकी असून त्यापैकी जवळपास ३१ कोटी कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. नव्या कामगार कायद्यांमुळे या कामगारांना मिळणारं सामाजिक सुरक्षा कवच पुढच्या २ ते ३ वर्षांमध्ये ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.