पुण्यात ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव उद्यापासून सुरू

जगभरातील संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला पुण्यातील मानाचा ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. येत्या २२डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संगीत सोहळ्यामध्ये शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज कलाकारांसह १५ नवीन कलाकार प्रथमच या मंचावर आपली कला सादर करणार आहेत.