सौदी अरेबियात मदिना जवळ बस आणि डिझेल टँकर यांच्यात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत 45 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून केवळ 1 जण बचावला आहे.
मृतांमध्ये 17 पुरुष, 18 महिला आणि 10 बालकं आहेत. प्रत्येक मृत भारतीय नागरिकाच्या कुटुंबियाला 5 लाख रुपये मदत म्हणून देणार असल्याचं तेलंगणा सरकारनं जाहीर केलं आहे. तेलंगणा सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ सौदी अरेबियाला पाठवण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे.