जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं आज प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. नवी दिल्लीच्या राममनोहर लोहिया रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
संविधानाचं ३७०वं कलम रद्द करुन जम्मूकाश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याची कारवाई सत्यपाल मलिक यांच्या कार्यकाळात झाली होती.
मलिक यांच्या राजकीय कारकिर्दीला १९७४ मधे उत्तरप्रदेश विधानसभेतून प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांनी अनेकदा राज्यसभेत उत्तरप्रदेशचं प्रतिनिधित्व केलं. लोकसभेत ते अलिगढ मतदारसंघातून जनता दलाच्या तिकिटावर निवडून गेले होते. बिहार, ओदिशा, गोवा आणि मेघालयचं राज्यपालपदही त्यांनी भूषवलं होतं.