डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांची वडिलोपार्जित मालमत्ता पाडू नये, असे भारताचे बांगलादेशला आवाहन

बांगलादेशातील मयमनसिंग येथील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या वडिलोपार्जित मालमत्ता पाडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. भारतानेही या प्रतिष्ठित इमारतीचे जतन करण्यासाठी मदत देऊ केली आहे.

 

मयमनसिंगमधील या ऐतिहासिक इमारतीला पाडण्याच्या हालचालीला गंभीर दुःखद बाब म्हणून भारताने बांगलादेशला दोन्ही देशांच्या सामायिक संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या इमारतीला संग्रहालयात रूपांतरित करण्याची विनंती केली. त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.

 

ही प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक इमारत सत्यजित रे यांचे आजोबा आणि प्रसिद्ध साहित्यिक उपेंद्र किशोर रे चौधरी यांची होती. सध्या बांगलादेश सरकारच्या मालकीची असलेली मालमत्ता जीर्ण अवस्थेत आहे. बांगलादेशी अधिकाऱ्यांकडून ही इमारत पाडली जाणार असल्याच्या वृत्तानंतर परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे .