९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन आज सातारा इथं ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते झालं. दलित साहित्य हा मराठी साहित्यविश्वाचा आत्मा असल्याची भावना त्यांनी उद्घाटनपर भाषणात व्यक्त केली. संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रं ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी मावळत्या अध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांच्याकडून स्वीकारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
पहिलीपासून हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा शिकवण्याच्या निर्णयाला साहित्यिक जगताचा विरोध असल्याची भूमिका, मावळत्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी तसंच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सचिव मिलिंद जोशी यांनी मांडली, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीला पुरेसा निधी मिळावा अशी मागणी त्यांनी मांडली.