सातारा जिल्ह्यातल्या उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज धरणाच्या वक्र दरवाजातून उरमोडी नदीत १५०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. जलविद्युत प्रकल्पातून या पूर्वीच सुरू असलेला ५०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरूच आहे. त्यामुळे सांडवा आणि जलविद्युत प्रकल्प असा एकूण दोन हजार क्युसेक विसर्ग नदी पात्रात होणार आहे.
वाशीम जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दोन दिवसांत सरासरी १४४.३ मि.मी. पाऊस झाला. यामध्ये जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्रावरच्या खरीप पिकाची हानी झाली. तर सात घरांची पडझड झाली वाशिम तालुक्यातल्या सात आणि मालेगाव तालुक्यातल्या एका विहिरीचे नुकसान झालं. तर १०८० हेक्टर शेतजमीन पावसाने खरडून गेली.पुरात अडकलेल्या पाच जणांची सुटका करण्यात आली.