डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतिनिमित्त त्यांना मान्यवरांची आदरांजली

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. सरदार पटेल हे महान देशभक्त आणि दूरदर्शी नेते आणि राष्ट्रनिर्माता होते. त्यांनी आपल्या अढळ संकल्प, अदम्य धैर्य आणि कुशल नेतृत्वादनं राष्ट्राला एकत्र आणण्याचं ऐतिहासिक कार्य केलं, अशाशब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली आहे. पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त मुर्मू  यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या पटेल चौकात पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली.

 

सरदार पटेल यांच्या दृढनिश्चय आणि दूरदृष्टीनं राष्ट्राला एकाच लोकशाही प्रजासत्ताकात एकत्र आणलं आहे. संस्थानांचं एकत्रीकरण आणि एकतेसाठी पटेल यांचं अमूल्य योगदान प्रेरणादायी आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पटेल यांना आदरांजली वाहिली आहे. 

 

सरदार वल्लभभाई पटेल हे देशाच्या एकात्मतेमागचे प्रेरक शक्ती होते. राष्ट्रीय अखंडता, सुशासन आणि सार्वजनिक सेवेसाठी पटेल यांची अढळ वचनबद्धता प्रत्येक पुढच्या पिढीला प्रेरणा देत राहील, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पटेल यांना आदरांजली वाहिली आहे. 

 

 दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आहे. सरदार पटेल यांनी संस्थानांना एकत्र करून देशाची एकता आणि सुरक्षा अधिक बळकट केली आणि देशाला स्वयंरोजगार आणि स्वावलंबनाकडे नेलं, अशा शब्दात गृहमंत्र्यांनी समाज माध्यमांवरून पटेल यांना आदरांजली वाहिली आहे.