सरदार वल्लभभाई पटेल यांना देशभरातून काल आदरांजली वाहाण्यात आली. अढळ संकल्प, अदम्य धैर्य आणि कुशल नेतृत्व असणारे दूरदर्शी नेते आणि राष्ट्रनिर्माते, ज्यांनी राष्ट्राला एकत्र आणण्याचे कार्य केले अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
तर संस्थानांचं विलीनीकरण आणि देशाच्या एकतेसाठी पटेल यांचं अमूल्य योगदान प्रेरणादायी असल्याचं उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन यांनी आदरांजली वाहाताना म्हणाले. देशाचं अखंडत्व, सुशासन यांप्रती पटेल यांची वचनबद्धता भावी पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत पंतप्रधानांनी पटेल यांना आदरांजली वाहिली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली.