केंद्रिय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयानं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय स्तरावर पदयात्रा आयोजित केली आहे. सरदार पटेलांचं मूळ गांव असलेल्या करमसाड गावातून आज या पदयात्रेचा प्रारंभ होणार असून ६ डिसेंबर रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं सांगता होणार आहे. स्वच्छता, स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा संदेश या दीडशे किलोमीटरच्या पदयात्रेतून दिला जाणार असल्याचं केंद्रिय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.
Site Admin | November 26, 2025 11:51 AM | Sardar Vallabhbhai Patel
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त पदयात्रेचं आयोजन