सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिली जाणारी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं देशभरातल्या १ हजार ४६६ पोलिसांना जाहीर झाली आहेत. विविध राज्यं, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय पोलीस यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. कारवाई, तपास, गुप्तचर यंत्रणा आणि न्यायवैद्यक शास्त्र या चार क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो, अशी माहिती गृहमंत्रालयानं दिली आहे.
Site Admin | October 31, 2025 1:34 PM | Sardar Vallabhbhai Patel
केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं देशभरातल्या १ हजार ४६६ पोलिसांना जाहीर