December 1, 2025 9:44 AM | Saras Food Festival

printer

नवी दिल्लीत सरस आजीविका अन्न महोत्सवाचं आयोजन

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्ली इथं सरस आजीविका अन्न महोत्सव 2025 चं उद्घाटन करतील. ग्रामीण विकास मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 25 राज्यांमधील सुमारे 300 लखपती दीदी आणि स्वयं-सहायता गटातील महिला या महोत्सवात सहभागी होतील. एकूण 62 दालनांपैकी 50 दालनांवर तयार अन्न उपलब्ध असेल, तर 12 दालनांवर नैसर्गिक अन्न उत्पादनं सादर केली जातील. हरियाणा, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि गुजरात ही राज्यं या अन्न महोत्सवात सहभागी होत आहेत, असं मंत्रालयानं म्हंटलं आहे. दिल्ली आणि शेजारच्या शहरांमधील पर्यटकांना देशातील विविध खाद्य संस्कृती आणि सामाजिक रचनेचं दर्शन घडवणाऱ्या 500 हून अधिक उत्कृष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येईल. हा अन्न महोत्सव या महिन्याच्या 9 तारखेपर्यंत सकाळी साडे 11 ते रात्री साडे 9 या वेळेत पर्यटकांसाठी सुरू राहील.