बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या २४ तारखेला होणार आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज ही माहिती दिली.
या प्रकरणातला आरोप विष्णु चाटे याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली, त्यानंतर निकम माध्यमांशी बोलत होते. या सुनावणीत न्यायालयानं दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतले असून आपला आदेश राखून ठेवल्याचं निकम यांनी सांगितलं.