डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 9, 2025 7:02 PM | DCM Ajit Pawar

printer

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तीन स्तरावर चौकशी सुरू – उपमुख्यमंत्री अजित पवार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी, तीन स्तरावर चौकशी सुरू असून, जे कुणी दोषी असतील, त्यांना सोडलं जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. 

 

या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरचं कुणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर पक्ष न बघता, कारवाई करावी अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, मात्र पुरावे नसतांना कोणावरही, आरोप करणं योग्य नाही, आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील, तर ते त्यांनी तपास यंत्रणांना द्यावेत, असं अजित पवार म्हणाले. त्यांनी आज पुण्यातल्या प्रलंबित विकास कामांचा आढावा घेतला.