संस्कृत भाषा ही जगाचं वैभव असून या भाषेचा तसंच साहित्य आणि संस्कृती यांचा दक्षिण आशियावर मोठा प्रभाव आहे, असं नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी म्हटलं आहे. काठमांडू इथं कालपासून आयोजित करण्यात आलेल्या 19 व्या जागतिक संस्कृत परिषदेत राष्ट्रपती पौडेल बोलत होते. पाच दिवस चालणाऱ्या या 19 व्या जागतिक संस्कृत परिषदेचं आयोजन नेपाळ संस्कृत विद्यापीठानं केलं आहे. जगभरातील अभ्यासक, संशोधक यामध्ये सहभागी झाले आहेत.
Site Admin | June 27, 2025 11:04 AM | Nepal | sanskrut
संस्कृत भाषा ही जगाचं वैभव असून या भाषेचा तसंच साहित्य आणि संस्कृती यांचा दक्षिण आशियावर मोठा प्रभाव आहे-नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल
