संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
लोकसभेतही कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी मतदार याद्या पुनरीक्षणावर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी केली. दरम्यान, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात उतरत घोषणाबाजी सुरू केली. या सदस्यांनी सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला. मात्र, त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत नंतर दोन आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सभागृहांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. विविध राजकीय पक्षांकडून १९ स्थगन प्रस्ताव मिळाले असून त्यातले काही बिहारच्या मतदार याद्या पुनरीक्षणाबाबतच्या असल्याची माहिती हरिवंश यांनी दिली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून या सर्व सूचना त्यांनी फेटाळल्या.
.