संसदेत येत्या सोमवारी ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चा होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांना काल माध्यमांशी बोलताना दिली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कामकाज समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.
संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा होणार असून त्यासाठी १६ तास देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव एकमताने मांडला जावा यावर बैठकीत एकमत झाल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.