संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी रविवारी केंद्रसरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत, संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्याचं आवाहन सरकार करेल.
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी, २१ जुलैपासून सुरु होणार असून ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत चालेल. अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊन ती मंजूर होण्याची शक्यता आहे.