डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम दर्जेदार करावं – मंत्री संजय शिरसाट

मुंबईत दादर इथल्या इंदू मिलमधे उभारल्या जात असलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं अनावरण एप्रिल 2026 पर्यंत करण्याचा मानस असून स्मारकाचं काम दर्जेदार करावं, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज या स्मारकाच्या कामाची पाहणी केली.

 

मुंबईत वरळी इथं सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुरु असलेल्या तीन वसतिगृहांना शिरसाट यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या सोयी- सुविधांमध्ये सुधारणा करुन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पध्दतीनं शिक्षण घेता यावं यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असं त्यांनी सांगितलं.