जागतिक आर्थिक मंदी आणि भू-राजकीय तणावामुळे आव्हान निर्माण झाल्यामुळेआर्थिक स्थैर्य आणि विकासाला पाठिंबा देण्यासाठी चलनविषयक धोरणाची भूमिका महत्त्वाची असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. फिक्की आणि इंडियन बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या फिबॅक या वार्षिक परिषदेला ते संबोधित करत होते.
प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आलेली मंदी आणि पुरवठा साखळीतला व्यत्यय या दरम्यान, नव्या संधीचा शोध घेणं महत्त्वाचं असल्याचंही मल्होत्रा म्हणाले. अमेरिकेबरोबर करवाढी संदर्भातल्या वाटाघाटी यशस्वी होतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा नगण्य परिणाम होईल, अशी आशा अजूनही असल्याचं ते म्हणाले.