डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 13, 2024 8:17 PM

printer

केंद्र सरकारच्या योजना माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत – सचिव संजय जाजू

केंद्र सरकारच्या योजना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत योग्यरित्या पोहोचवल्या जात आहेत, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज सांगितलं. 

 

नागपूर इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत विविध प्रसार माध्यमांच्या अधिका-यांच्या आढावा बैठकीनंतर ते आकाशवाणी इथे बोलत होते. या वेळी पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्यूरो, दूरदर्शन आणि आकाशवाणीचे अधिकारी उपस्थित होते. 

 

विदर्भात आकाशवाणी, दूरदर्शन बरोबरच अमरावतीची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन -आयआयएमसी देखील माहिती प्रसारणासाठी उपयुक्त ठरत आहे, असं जाजू यांनी सांगितलं. या सर्व संस्थामध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सोयी-सुविधांबाबत या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.