कथित आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल झालेले ब्रिटनचे नागरिक यूट्यूबर डॉक्टर संग्राम पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने आज मुंबई पोलिसांना नोटीस बजावली आहे. पोलिसांनी याचिकेला उत्तर द्यावं असं न्यायालयाने सांगितलं. याप्रकरणी पुढील सुनावणी ४ फेब्रुवारीला होणार आहे.
पाटील यांनी भाजपा नेत्यावर कथितरित्या आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेलं लूक ऑऊट सर्क्युलार रद्द करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. पाटील यांना त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती नव्हती, ते स्वतःहून भारतात आले होते, असं पाटील यांचे वकील सुदीप पासबोला यांनी सांगितलं. तर पाटील पोलिसांसोबत सहकार्य करत नाहीत असं सरकारी वकील मिलिंद साठे यांनी सांगितलं. भाजपाचे माध्यम समन्वयक निखिल भामरे यांच्या तक्रारीवरून संग्राम पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.