February 16, 2025 3:25 PM | Sangli

printer

सांगलीत बालस्नेही विधी सेवा योजनेच्या जनजागृतीसाठी शिबिराचं आयोजन

बालस्नेही विधी सेवा योजना २०२४ बाबत जनजागृती करण्यासाठी सांगलीत एक शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सामान्य किमान कार्यक्रमा अंतर्गत आयोजित या शिबिरात बालश्रम प्रतिबंध, पोक्सो यासारख्या बालहक्कांच्या कायद्यांची  तसंच ऑनलाईन तक्रार नोंदणीसाठीच्या टोल फ्री क्रमांकाबद्दल मुलांना माहिती देण्यात आली.