ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम यांचं काल निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या. निर्माता आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या नवरंग या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. अरे जा रे हट नटखट हे त्यांचं गाणं लोकप्रिय ठरलं.
त्याशिवाय झनक झनक पायल बाजे, जल बिन मछली- नृत्य बिन बिजली, दो आँखे बारह हात, अमर भूपाळी, पिंजरा अशा विविध चित्रपटांमधून त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या. संध्या यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी संध्या यांना आदरांजली वाहिली आहे.