December 3, 2025 1:30 PM | Sanchar Saathi App

printer

‘संचार साथी’ ॲपबद्दल सरकारचं स्पष्टीकरण

संचार साथी या ॲपमुळे खासगी आयुष्यात ढवळाढवळ होण्याचा किंवा नागरिकांवर लक्ष ठेवण्याचा कोणताही धोका निर्माण होत नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. उलट, यामुळे फसवणुकीचे प्रकार टाळणं, हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन ब्लॉक करणं, आपल्या नावावरची मोबाईल कनेक्शन तपासून अनधिकृत कनेक्शन रिपोर्ट करणं, मोबाईल हँडसेट खरा आहे किंवा नाही, हे तपासणं इत्यादी गोष्टी करणं नागरिकांना सोपं होईल, असं सरकारनं म्हटलं आहे.