उद्या संविधान हत्या दिवस पाळण्यात येणार

संविधान हत्या दिवस उद्या पाळण्यात येणार आहे. २५ जून १९७५ या दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. या १८ महिन्यांच्या  काळात मानवाधिकारांसाठीच्या लढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या सर्वांना त्यानिमित्त आदरांजली वाहण्यात येईल. या निमित्तानं प्रत्येक भारतीयाच्या मनात वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाहीची ज्योत तेवत राहते, तसंच हुकुमशाही प्रवृत्तींशी लढा देण्याची प्रेरणा मिळत राहावी याकरता हा दिवस गेल्या वर्षीपासून पाळला जातो.