देशातली पहिली स्वदेशी बनावटीची प्रदूषण नियंत्रक ‘समुद्र प्रताप’ युद्धनौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज गोवा इथं दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी उपस्थित होते. ही युद्धनौका सागरी प्रदूषण नियंत्रण नियमन, सागरी कायदा अंमलबजावणी, बचाव आणि शोध मोहीम राबवण्यात उपयोगी पडेल. ही युद्धनौका देशाचा सामुहिक दृढनिश्चय आणि आत्मविश्वास यांचं प्रतीक असल्याचं सरंक्षण मंत्री यावेळी म्हणाले. सागरी जैवविविधतेचं संरक्षण करणं हे नैतिक जबाबदारी आहे, हे जहाज प्रवाळ खडक आणि समुद्री जिवांंचं रक्षण करेल, असं ते म्हणाले.
नौदलाच्या ताफ्यात समुद्र प्रताप युद्धनौका समाविष्ट झाल्यामुळे भारतीय तटरक्षक दलाची क्षमता वाढणार असून सागरी सुरक्षा, पर्यावरण सरंक्षण आणि स्वदेशीच्या संकल्पनेला चालना मिळणार आहे.