डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज नांदेड इथं सुरुवात

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज महाराष्ट्रातल्या नांदेड इथं सुरुवात होत आहे. तर धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या या अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, जालना, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, धाराशिव, पालघर, सोलापूर, वाशिम,वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा या अभियानात समावेश झाला आहे.