छत्रपती संभाजीनगर इथं प्रचाररॅली दरम्यान दंगल भडकावल्याप्रकरणी ६० जणांविरोधात गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर इथं काल एमआयएम पक्षाच्या प्रचाररॅली दरम्यान, बेकायदेशीर जमाव करणं, दंगल भडकावल्याप्रकरणी ६० जणांविरोधात  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

यातल्या १३ जणांची ओळख पटली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी खासदार इम्तियाज जलील यांची पायी मिरवणूक सुरू असताना एमआयएम आणि प्रतिस्पर्धी गटाच्या लोकांमधे  मारामारी झाली. यावेळी काही जणांनी जलील यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.