सलमान रश्दी हल्ला प्रकरणी हादी मतारला ३० वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता

प्रसिद्ध ब्रिटिश- भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूनं हल्ला करणाऱ्या हादी मतारला न्यूयॉर्क न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. २३ एप्रिल रोजी न्यायालय मतारला शिक्षा सुनावणार असून त्याला ३० वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. ऑगस्ट २०२२ मध्ये न्यू यॉर्कमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात रश्दी गंभीर जखमी झाले होते.