पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातल्या सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राला एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राज्यात सर्वाधिक प्रसूती सेवा पुरविल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसंच पालघर जिल्ह्यानं राज्यात सर्वाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याबद्दल द्वितीय क्रमांकाचा सन्मान मिळवला आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून “महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५” हा पुरस्कार सोहळा मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या सोहळ्यात जिल्ह्याला हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.