January 17, 2025 7:40 PM | Saif ali Khan

printer

सैफ अली खान हल्लाप्रकरणी एक संशयित ताब्यात

अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका संशयिताला पकडलं आहे. त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात नेलं असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान सैफ अली खान यांच्यावर शस्त्रक्रीया करून पाठीत अडकलेला चाकूचा तुकडा डॉक्टरांनी काढला आहे. सैफ यांच्या जिवाचा धोका टळला असला तरी विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.