साहित्य अकादमीनं वार्षिक बाल साहित्य आणि युवा पुरस्कारांची घोषणा आज केली. मराठी भाषेसाठी सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे. तर युवा पुरस्कार प्रदिप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीला मिळाला आहे. स्मृतीचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे.
Site Admin | June 18, 2025 8:02 PM | Sahitya Akademi Award
साहित्य अकादमीचे बाल साहित्य आणि युवा पुरस्कार जाहीर
