नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष आज अकरा दिवसांच्या प्रदर्शनासाठी भूतानला पाठवले जाणार आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार हे या अवशेषांना घेऊन जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील.
हे प्रदर्शन थिंफूमधल्या जागतिक शांतिप्रार्थना उत्सवाचा एक भाग असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयानं दिली.