केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज हरियाणातल्या रोहतक इथं साबर डेअरी प्रकल्पाचं उद्घाटन केलं. गेल्या ११ वर्षांत देशाच्या डेअरी क्षेत्रात ७० टक्क्यांची वाढ झाल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं.
साबर डेअरीचा हा प्रकल्प देशातला सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, तसंच संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्राची दुधाची गरज पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.